25 May 2020

News Flash

Video : असली कसली फलंदाजी? चेंडू खेळताना गोलंदाजालाच दाखवली पाठ

विचित्र फटका खेळून फलंदाजाने चौकारदेखील मिळवला...

क्रिकेटचे मैदान हे कायम अनिश्चित घटनांसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या सामन्यात केव्हा काय होईल याचा काहीही नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार कामगिरीमुळे गमावतो. काही वेळा गोलंदाज विचित्र पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतो, तर कधी फलंदाज विचित्र पद्धतीने फलंदाजी करतो. अशाच एका विचित्र फलंदाजीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

क्रिकेट जगातमध्ये फलंदाजीसाठी उभे राहण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. पण या व्हिडीओमध्ये फलंदाज गोलंदाजाकडेच पाठ फिरवून फलंदाजीसाठी उभा असलेला दिसतो आहे. अशा पद्धतीची विचित्र फलंदाजी या आधी फारशी पाहायला मिळालेली नाही.

ऑस्ट्रेलियामध्ये ही गोष्ट घडली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली याने अशी विचित्र फलंदाजी केली. एका स्थानिक सामन्यात ही गोष्ट घडली. ऑस्ट्रेलियामधील टास्मानिया संघातून खेळाताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली फलंदाजी करत होता. त्यावेळी गोलंदाजाला पाठ दाखवून तो खेळत असल्याचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर त्याने या चेंडूवर चौकारदेखील मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 10:38 am

Web Title: australian batsman george bailey bats while showing back to bowler and facing the wicket keeper video vjb 91
Next Stories
1 शतकवीर शुभमनने केला कोणालाही न जमलेला विक्रम
2 देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा  : भारत ‘क’ संघ अंतिम फेरीत
3 न्यूझीलंड-इंग्लंड क्रिकेट मालिका : इंग्लंडच्या विजयात विन्स चमकला
Just Now!
X