कसोटी मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध वन-डे मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. १४ सदस्यीय संघात ऑस्ट्रेलियाने काही आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. फिरकीपटू नॅथन लॉयन, उस्मान ख्वाजा आणि पिडर सिडल यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

भारताविरुद्ध वन-डे मालिकेसाठी असा असेल ऑस्ट्रेलियाचा संघ –

अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), पिटर हँडस्काँब, उस्मान ख्वाजा, नॅथन लॉयन, मिचेल मार्श, शॉन मार्श, ग्रेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, पिटर सिडल, बिली स्टॅनलेक, मार्कस स्टॉयनिस, अॅडम झॅम्पा