ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाठदुखीने घात केल्याचे सांगत पराभवामुळे दुखी असल्याचे अव्वल मानांकीत खेळाडू राफेल नदालने म्हटले. नदाल पाठदुखीशी गेले काही महिने झुंझतो आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही नदालने आपली पाठदुखी सावरत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. परंतु, अंतिम सामन्यातच नदालचा त्याच्या पाठदुखीने घात केला. पहिल्या सेटमधील पराभवानंतर नदालचा पाठदुखीचा त्रास वाढला.
सामन्यात त्याच्यावर उपचारही करण्यात आले. यावर प्रतिस्पर्धी वॉवरिन्कानेही नदालला सहन कराव्या लागणाऱया पाठदुखीवर चिंता व्यक्त केली. परंतु, लढवय्या नदालने मैदानात पुनरागमन केले आणि सामना पुढे सुरू ठेवला. पुढच्या सेटमध्ये वॉवरिन्काला कडवी टक्करही नदालने दिली परंतु, वॉवरिन्काने त्यापुढील सेटमध्ये मोठ्या फरकाने विजय प्राप्त करत विजेतेपद गाठले.
राफेल नदाल म्हणाला की, पहिल्या सेट नंतर माझ्या पाठिचा त्रास असह्य झाला आणि त्यानंतर मला ठिक वाटत नव्हते. मला खेळावर संपूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी येत होत्या. ही माझ्यासाठी वाईट गोष्ट होती. असेही नदाल म्हणाला. शाररिक कारणामुळे चांगले खेळू शकलो नाही. याच्यामुळे नदालचे डोळे पाणावले आणि पराभवावर दु:खी असल्याचे नदालने स्पष्ट केले.