तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर तर भारताचा पहिला डाव १४५ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि जॅक लीच यांच्या फिरकीपुढे ‘टीम इंडिया’च्या दिग्गजांनी गुडघे टेकले. रोहित शर्माचा (६६) अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. भारताला पहिल्या डावाअखेरीस केवळ ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवातही खराब झाली. अक्षर पटेलने पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन दिले.

Video: अजब-गजब अंपायर! खेळाडूंनी DRS गमावल्यावर केलं सेलिब्रेशन

अक्षरचं पहिलं षटक अत्यंत नाट्यमय ठरलं. अक्षरने पहिल्या चेंडूवर जॅक क्रॉलीला माघारी धाडलं. पहिल्या डावातील अर्धशकतवीर दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अक्षरने जॉनी बेअरस्टोला पायचीत पकडलं. पण DRSच्या मदतीने त्याला नाबाद ठरवण्यात आले. थरार इथेच न संपता पुढील चेंडूवर अक्षरने चेंडूचा टप्पा थोडा आखूड टाकला. तो चेंडू बेअरस्टोला न समजल्याने तोदेखील शून्यावर त्रिफळाचीत झाला.

पाहा ते नाट्यमय तीन चेंडू…

IPL 2021: मॅक्सवेल, जेमिसनच्या कामगिरीमुळे RCB झाली ट्रोल

दरम्यान, इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यात केवळ झॅक क्रॉलीने अर्धशतक केले. तर अक्षर पटेलने ३८ धावांत ६ बळी टिपले. त्यानंतर भारताचा पहिला डावही स्वस्तात संपला. रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला कशीबशी १४५ धावांपर्यंत मजल मारणं शक्य झालं. कर्णधार जो रुटने अवघ्या ८ धावा देत ५ गडी टिपले.