News Flash

गोपीचंद यांनी कन्येसाठी मला संघातून डावललं; बॅडमिंटनपटू अपर्णा बालनचा गंभीर आरोप

आशियाई खेळांसाठी संघातून अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अपर्णा बालन हिला वगळण्यात आले आहे.

गोपीचंद यांनी कन्येसाठी मला संघातून डावललं; बॅडमिंटनपटू अपर्णा बालनचा गंभीर आरोप
राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद

भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री हिची आशियाई खेळांसाठी भारतीय बॅडमिंटन संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेने आशियाई खेळांसाठी भारताच्या २० सदस्यीय संघाची परवा घोषणा केली. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता शहरात आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आले आहे. यातील पुरुष संघाचे नेतृत्व किदम्बी श्रीकांतकडे तर महिला संघाचे नेतृत्व सायना नेहवालकडे सोपवण्यात आले आहे.

या संघातून अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अपर्णा बालन हिला वगळण्यात आले होते. या संबंधी अपर्णा हिने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बाई) आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, कन्या गायत्री गोपीचंद आणि आकर्षि कश्यप यांच्याविरोधात केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

३१ वर्षीय अपर्णा हिने २९ जून २०१८ रोजी दाखल केलेल्या याचिकेत तिला संघातून वगळण्यात येणे हे अयोग्य आहे, असे म्हटले आहे. आपली कन्या गायत्री हिला संघात स्थान मिळावे, या कारणास्तव मला या संघातून वगळण्याचा निर्णय पुलेला गोपीचंद यांनी घेतला असल्याचेही आरोप तिने या याचिकेत केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2018 5:04 pm

Web Title: badminton gopichand daughter team aparna balan exclusion petition
टॅग : Badminton,Gopichand
Next Stories
1 Indonesia Open : सायना स्पर्धेबाहेर; चीनच्या युफेईकडून सरळ गेममध्ये पराभूत
2 …आणि झिम्बाब्वेचा संघ रात्रभर रस्त्यावरच झोपला
3 विराटला चीअर करायला अनुष्का इंग्लंडमध्ये दाखल
Just Now!
X