बॅडमिंटन खेळाची गुणपद्धती सर्वोत्तम पाच गेमऐवजी तीन गेमपुरतीच मर्यादित राहील, असा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आला.

ऑनलाइन झालेल्या मतदानामध्ये २८२ जणांनी मते नोंदवली. ६६.३१ टक्के जणांनी या पद्धतीला पाठिंबा दर्शवला, मात्र ३३.६९ जणांनी विरोध केल्यामुळे नियमानुसार एकूण मतांपैकी दोन-तृतीयांश तीन मते मिळवण्यात पाच गेमची गुणपद्धती अपयशी ठरली. बॅडमिंटनमध्ये सध्या २१ गुणांचे सर्वोत्तम तीन गेम यानुसार सर्व सामने रंगतात. यापूर्वी २०१४मध्ये ११ गुणांच्या सर्वोत्तम पाच गेमचा प्रयोग करण्यात आलेला. इंडोनेशिया, मालदीव, कोरिया, चायनीज तैपई येथील बॅडमिंटन संघटनांचा पाच गेमच्या पद्धतीला पाठिंबा होता.

एकूण मतांपैकी दोन-तृतियांश मते मिळवण्यात पाच गेमच्या गुणपद्धतीला अपयश आले. त्यामुळे बॅडमिंटनचे सामने पूर्वीच्या गुणपद्धतीनुसारच खेळवण्यात येतील. जगभरातील बॅडमिंटन संघटनांनी या मतप्रक्रियेत सहभाग नोंदवल्यामुळे मी आनंदी आहे.

-पॉल एरिक होयर, जागतिक बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष