News Flash

BCCIचे स्कोरर के. के. तिवारी यांचा करोनामुळे मृत्यू

तिवारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार

किशन कुमार तिवारी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी स्कोरर किशन कुमार तिवारी यांचे शनिवारी करोनामुळे निधन झाले. तिवारी यांना काही काळ झज्जर येथील एम्समध्ये दाखल केले करण्यात आले होते. या रुग्णालयात ते व्हेंटिलेटरवर होते, परंतु शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

दिल्ली स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशनचे (डीएसजेए) सचिव राजेंद्र सजवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळपर्यंत तिवारींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी होती. पण शनिवारी तिवारी यांची प्रकृती खालावली.

सजवान म्हणाले, ”तिवारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मोठ्या मुलीने वकिली केली आहे. लहान मुलगी बारावी पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकीची तयारी करत आहे. त्यांचा छोटा मुलगा सातवीत शिकतो.

दिल्ली स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशनचे स्थानिक क्रीडा अधिकारी आणि क्रीडा पत्रकार यांनी केके तिवारी यांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. डीएसजेएने जारी केलेल्या निवेदनात सज्जन म्हणाले, “अत्यंत दु: खद बातमी आहे. आम्ही क्रीडा पत्रकारांचे प्रिय तिवारी यांना विसरू शकत नाही. कोणी आपले गेले असल्याची भावना आहे. के.के. भाई तुम्ही नेहमीच आमच्या मनात राहाल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 11:37 am

Web Title: bcci scorer kishan kumar tiwari passes away due to corona adn 96
टॅग : Bcci
Next Stories
1 .. तरीही दोघांना करोनाची बाधा!
2 माजी हॉकीपटू-प्रशिक्षक कौशिक यांचे करोनामुळे निधन
3 माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंग कालवश
Just Now!
X