News Flash

VIDEO : धोनीची विजेच्या वेगाने स्टम्पिंग, टेलरही अवाक!

धोनीची चपळाई

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या एखदिवसीय सामन्यात एमएस धोनीची चपळाई पुन्हा एकदा समोर आली. यावेळी विजेच्या चपळाईने स्टंपिंग करत धोनीने धोकादायक रॉस टेलरला बाद केले. त्याने केलेल्या या स्टपिंगचे सोशल मिडीयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारताने दिलेल्या आव्हाना पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. एका बाजून विकेट पडत असताना अनुभवी रॉस टेलर मैदानावर स्थिरावत होता. केदार जाधवच्या गोलंदाजीवर धोनीने भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. केदारच्या खाली राहणाऱ्या चेंडूवर टेलरने पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, धोनीने विजेच्या वेगाने स्टंप उखाडत त्याला तंबूत झाडले.

प्रथम फलंदाजी करताना धोनीने नाबाद ४८ धावांची खेळी करत मोलाचे योगदान दिले. फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणावेळी विजेच्या वेगाने टेलरला बाद केले. धोनीच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर तौंडभरून कौतुक होत आहे. माजी कर्णधार धोनी यष्टिमागून भारतीय गोलंदाजांना मार्गदर्शन करत होताच. त्याचबरोबर त्याने महत्त्वाचा फलंदाज रॉस टेलरची घेतलेली विकेट अशी कौतुकाची थाप चाहते धोनीवर टाकत आहेत.

कुलदीप यादवची भेदक गोलंदाजी आणि रोहित-धवन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला. या विजयासह विराटसेनेने भारतीयांना प्रजासत्ताक दिनाची भेट दिली आहे. भारताने दिलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना ४०.२ षटकांत न्यूझीलंडचा संघ २३४ धावांवर गारद झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात सात बळी घेतले. कुलदीप यादवने चार बळी घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. चहलने दोन आणि केदार जाधवने एक बळी घेत कुलदीपला चांगली साथ दिली. याशिवाय भुवनेश्वरने दोन आणि शामीने एका फलंदाजाला बाद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 5:59 pm

Web Title: behind the stump faster one and only msdhoni
Next Stories
1 कुंबळेच्या या विक्रमाची कुलदीपने केली बरोबरी
2 प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच भारताने जिंकला एकदिवसीय सामना
3 ‘मी चुकलोच’; सर्फराझने भेट घेऊन मागितली ‘त्या’ खेळाडूची माफी
Just Now!
X