ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे विजयाचे सातत्य इतिहास जमा झाले आहे का? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. आफ्रिकेच्या मैदानावर कांगारुंची निराशाजनक कामगिरी आणि बांग्लादेशकडून कसोटीमध्ये पत्करावा लागलेला पराभव पाहता ऑस्ट्रेलियन संघाने कसोटीमधील आपली ओळख गमावल्याचे सध्याचे चित्र आहे. बदलत्या क्रिकेटसोबत खेळामध्ये वेगवेगळे संघ वर्चस्व मिळविताना दिसतात. पण इतिहासातील काही सामने आजही खेळातील आनंद आणि रंगतदारपणामुळे पुन्हा पाहावेसे वाटतात. क्रिकेट चाहत्यांमध्ये आपला संघ जिंकावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यातही जर चुरशीचा सामना पाहायला मिळाला तर क्रिकेट चाहत्यांचा आनंद द्विगुणित होत असतो.

क्रिकेटच्या इतिहासातील चुरशीच्या लढतीचे हे काही क्षण तुम्हाला नक्कीच आनंद देणारे ठरतील. क्रिकेटच्या मैदानात रंगलेल्या चुरशीच्या लढतीतील लक्षवेधी दहा क्षणांचा या व्हिडिओची सुरुवात आणि शेवट ही क्रिकेटचा जगजेत्ता म्हणून मिरविणाऱ्या ऑस्टेलियन संघाच्या क्षणांनी होते. या व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑस्टेलिया आणि झिम्बाव्बेमध्ये अखेरच्या षटकापर्यंत रंगलेली चुरस पाहायला मिळेल. ग्लेन मेग्राच्या हातात चेंडू असताना झिम्बाव्बेच्या फलंदाजांनी ३०३ धावांचा टप्पा पार करण्यासाठी कडवी झुंज दिल्याचे दिसेल.

मेग्राने अचूक मारा करत अखेर झिम्बाब्वेला रोखण्यात यश मिळविले. पण झिम्बाव्बेने मेग्राच्या गोलंदाजीवर शेवटच्या क्षणापर्यंत दिलेली झुंज आजही क्रिकेटच्या रंगतदार सामन्यामध्ये गणली जाते. अखेरच्या षटकापर्यंत चुरशीच्या रंगतदार सामन्यांच्या या व्हिडिओमध्ये दहा क्षण आहेत, जे क्रिकेट चाहत्यांना एक वेगळा अनुभव देतील. या व्हिडिओचा शेवट हा ऑस्ट्रेलियाच्या आताच्या परिस्थितीशी मिळता जुळता आहे. याव्यतिरिक्त या व्हिडिओमधील रंगतदार क्षणासाठी व्हिडीओ नक्की पाहा….