हॉकीचे जादूगार म्हटले जाणाऱ्या ध्यानचंद यांच्या मोठ्या मुलाचे म्हणजेच ब्रिजमोहन सिंग यांचे सोमवारी निधन झाले. त्याचा धाकटा भाऊ आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार अशोक कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

 

ब्रिजमोहन हे ८२ वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार झाला. ते राजस्थान क्रीडा परिषदेचे सेवानिवृत्त प्रादेशिक क्रीडा अधिकारी होते. अशोक यांनी आयएएनएसला सांगितले, “माझे बंधू एका महिन्यापूर्वी करोनातून सावरले होते. त्यांची प्रकृती ठीक होती. त्यांना इंग्रजी चित्रपट पाहण्याची आवड होती आणि ते काल रात्री पाहत होते. ते मॉर्निंग वॉकलाही गेले होते. परत आल्यानंतर त्यानी बाथरूममध्येच प्राण सोडले.”