भारत आणि विंडीज यांच्यात झालेला दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत विंडीजने भारताशी बरोबरी साधली. या सामन्यात विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील १० हजार धावांचा टप्पा गाठला. महेंद्रसिंग धोनीदेखील भारताकडून १० हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी नजीक होता. पण तो केवळ ३० धावा करून तंबूत परतला आणि भारतीय क्रिकेटप्रेमी हळहळले. धोनीच्या या निराशाजनक कामगिरीमुळे एका भाजपा नेत्याने त्याला सरळ निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला. परंतु, भाजपा नेत्याचे हे ट्विट त्या नेत्यासाठीच डोकेदुखी ठरली.

पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाबुल सुप्रियो यांनी धोनीच्या निराशाजनक कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी धोनीला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. ‘मी धोनीचा सर्वात मोठा चाहता आहे. पण तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ज्या पद्धतीने बाद झाला, ते स्वीकाररण्याजोगे नाही. त्यामुळे आता धोनीने निवृत्त व्हावे, असा सल्ला त्यांनी ट्विटमध्ये दिला.

मात्र हे ट्विट त्यांच्यावरच उलटले. धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्यापेक्षा मोदींनी निवृत्त व्हायला हवे, अशा प्रतिक्रिया या ट्विटवर त्यांना नेटिझन्सने दिला.

—-

—-


—-

दरम्यान, धोनीला पहिल्या सामन्यात फलंदाजी मिळली नव्हती. त्यामुळे या सामन्यात तो लौकिकास साजेशी कामगिरी करत आपली चमक पुन्हा नव्याने दाखवून देईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण मॅकॉयच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला.