05 April 2020

News Flash

दक्षिण आफ्रिकेच्या रोमहर्षक विजयात एन्गिडी चमकला

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १७७ धावा केल्या.

लंडन : दक्षिण आफ्रिका वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने अखेरच्या दोन षटकांत तीन बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडविरुद्ध एक धावेने रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्यामुळे आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १७७ धावा केल्या. यात टेंबा बव्हुमा (४३), क्विंटन डी कॉक (३१) आणि रॅसी व्हॅन डर दुसेन (३१) यांचे महत्त्वाचे योगदान होते. मग जेसन रॉय आणि कर्णधार ईऑन मार्गन यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने दमदार सुरुवात केली. परंतु अखेरच्या तीन षटकांत इंग्लंडने २४ धावा काढताना सहा फलंदाज गमावले. त्यामुळे इंग्लंडला २० षटकांत ९ बाद १७६ धावाच करता आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:12 am

Web Title: bowler lungi ngidi shines in south africa thrilling victory zws 70
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राच्या बाद फेरीच्या आशा धुसर
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईची आघाडीच्या दिशेने वाटचाल
3 आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : युवा मलेशियाकडून भारताची हार
Just Now!
X