एएफपी, साव पावलो

ब्राझीलचा फुटबॉलपटू नेयमार याच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप लावले असले तरी या प्रकरणाचे कोणतेही पुरावे पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे ब्राझीलमधील सरकारी वकिलांनी हा खटला बंद करण्याची मागणी न्यायाधीशांकडे केली आहे.

‘‘चार भिंतींच्या आड काय झाले असेल, हे समजणे अशक्य आहे. याबद्दल आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळेच हे प्रकरण इथेच बंद करण्याचे आम्ही ठरवले आहे,’’ असे सरकारी वकील फ्लॅविया मेरलिनी यांनी सांगितले. मे महिन्यात पॅरिस येथील एका हॉटेलमध्ये नेयमारने आपल्यावर बलात्कार केला होता, असा आरोप ब्राझीलमधील एका महिलेने केला होता. नेयमारने समाजमाध्यमांवर सात मिनिटांचा व्हिडीयो टाकत हे आरोप फेटाळून लावले होते.