BWF World Tour Finals बॅडमिंटन स्पर्धा चीनमध्ये १२ ते १६ डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताला पी व्ही सिंधुकडून अपेक्षा आहेत. मात्र या स्पर्धाच्या मानांकनाच्या यादीत सिंधूची घसरण झाली आहे. या स्पर्धेत सिंधू एका स्थानाने घसरून पाचव्या स्थानी फेकली गेली आहे. गुरुवारी BWF World Tour Finals या स्पर्धेसाठी मानांकनाची यादी जाहीर करण्यात आली.
गेल्या आठवड्यात झालेल्या Korea Open बॅडमिंटन स्पर्धेत जपानची नोझुमी ओकुहरा ही स्पर्धेची विजेती ठरली होती. त्यामुळे तिने तीन स्थानांनी झेप घेतली. परिणामी सिंधूची एका स्थानाने घसरण होऊन ती पाचव्या स्थानी गेली. तसेच ताई झू यिंग आणि कॅरोलिना मरीन या दोघीही एक एक स्थानाने खाली घरच्या असून त्या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी फेकल्या गेल्या आहेत. दरम्यान, जागतिक क्रमवारीत मात्र सिंधू दुसऱ्या स्थानी कायम आहे.
पुरुष एकेरीमध्ये बॅडमिंटनपटू समीर वर्मा हा भारताची एकमेव आशा आहे. या स्पर्धेच्या मानांकनात त्याला आठवे स्थान मिळाले आहे. पण एचएस प्रणॉय आणि किदम्बी श्रीकांत हे आघडीचे खेळाडू पहिल्या २० मध्येही नाहीत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2018 12:02 pm