News Flash

रोनाल्डोचा रिआल माद्रिदला रामराम?

रोनाल्डो रिआल माद्रिद सोडणार??

ख्रिस्तियानो रोनाल्डो

करचुकवे प्रकरणी स्टार फुटबॉलर ख्रिस्तीयानो रोनाल्डो रिआल माद्रिद क्लब सोडण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. पोर्तुगालमधील क्रीडा दैनिक ‘बोला’ याने यासंदर्भातील वृत्त प्रसारित केलंय. अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिल्याचा दावा वृत्तपत्राकडून करण्यात आलेला असून ३२ वर्षीय रोनाल्डोने क्लब सोडण्याचा विचार निश्चीत केला असल्याचं म्हणलंय. आपल्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन रोनाल्डोने हा निर्णय घेतल्याचं ‘बोला’ने आपल्या वृत्तात म्हणलंय.

स्पॅनिश अधिकाऱ्यांनी रोनाल्डोविरोधात १४.७ मिलीअन युरोज बुडवल्याचा दावा ठोकला आहे. मात्र रोनाल्डोने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणी रिआल माद्रिद रोनाल्डोच्या पाठीमागे भक्कम उभा होता. रोनाल्डोने कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं माद्रिदच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे रोनाल्डो क्लब सोडत असलेल्या बातमीवर रिआल माद्रिदने अजुनही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.

चॅम्पियन्स लिगच्या अंतिम सामन्यात रोनाल्डोने केलेल्या २ गोलच्या बळावर रिआल माद्रिदने ज्युवेन्तस संघाचा ४-१ असा पराभव केला होता. पोर्तुगालच्या संघातही रोनाल्डोचा आतापर्यंत महत्वाचा वाटा राहिलेला होता. २००९ साली मँचेस्टर युनायटेडला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तब्बल ८ वर्ष रोनाल्डो रिआल माद्रिदसोबत कायम होता. रोनाल्डोच्याच काळात रिआल माद्रिदने चॅम्पियन्स लिग आणि ला लिग या स्पर्धेच दोन वेळा विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे रिआल माद्रिदचा कणा असलेला रोनाल्डो संघाला खरच रामराम करणार का हे पाहणं येत्या काही दिवसात महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 8:38 pm

Web Title: champions league ronaldo is planning to quit real madrid
Next Stories
1 ICC champions trophy 2017 : भारतीय संघाला आवरण्यासाठी आमिर सावरला, पुनरागमनाचे संकेत
2 India vs Pakistan champions trophy 2017 Final : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी, कुठे रंगणार?; जाणून घ्या!
3 ‘तो’ विक्रम पुन्हा भारतीयाच्याच नावावर
Just Now!
X