27 September 2020

News Flash

ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा : भारताची ऑस्ट्रियावर मात

तब्बल बारा वर्षांच्या काळानंतर पुन्हा ऑलिम्पियाडमध्ये आलेल्या आनंदने रॅगरवर सफाईदार विजय मिळवला.

विश्वनाथन आनंद

बाटुमी (जॉर्जिआ) : जलद बुद्धिबळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने ऑस्ट्रियाच्या मार्कस रॅगरवर मात करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले, तर भारतीय महिलांनी व्हेनेझुएलावर निर्विवाद विजयासह ४३ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील घोडदौड कायम ठेवली आहे.

तब्बल बारा वर्षांच्या काळानंतर पुन्हा ऑलिम्पियाडमध्ये आलेल्या आनंदने रॅगरवर सफाईदार विजय मिळवला. विदित गुजराथीने प्रारंभी आंद्रेस डिएरमेअरवर विजय मिळवल्यानंतर पी. हरिकृष्णाने व्हॅलेंटाइन ड्रॅगनेवच्या चुकीचा फायदा उठवत त्याच्यावर मात केली, तर बी. अधिबानने पीटर श्रेइनरला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडल्याने भारताला ऑस्ट्रियावर ३.५-०.५ असा विजय मिळवता आला. भारताच्या या विजयासह भारत द्वितीय स्थानावर असून पुढील सामन्यात भारताला कॅनडाच्या खेळाडूंशी झुंजायचे आहे.

महिलांची व्हेनेझुएलावर मात

भारतीय महिलांनी व्हेनेझुएलावर ४-० असा विजय मिळवत आपला दबदबा कायम राखला आहे. महिलांपैकी डी. हरिका हिला सराई कॅरोलिना सॅचेझ कॅस्टीलाने चांगली लढत दिली, मात्र हरिकाने अखेरीस तिच्यावर मात करीत भारताला निर्भेळ यश मिळवून दिले. सर्वच्या सर्व चारही सामने जिंकत महिलांनी आगेकूच केली असून भारताला पुढील सामन्यात सर्बियाशी लढावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 1:22 am

Web Title: chess olympiad viswanathan anand leads men to comfortable win
Next Stories
1 टेबल टेनिससाठी प्रथमच पूर्ण वेळ विदेशी प्रशिक्षक
2 पॅराआशियाईच्या खेळाडूंना शाहरुखकडून शुभेच्छा
3 विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज चमकला
Just Now!
X