News Flash

चेतेश्वर पुजारा बनला ‘बाप’माणूस, ट्विटरवरुन लाडक्या मुलीसोबतचा फोटो केला शेअर

सहकाऱ्यांकडून पुजाराचं अभिनंदन

चेतेश्वर पुजारा आपल्या लाडक्या मुलीसोबत

भारतीय कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या खांद्यावर आता आणखी एक महत्वाची जबाबदारी आलेली आहे. चेतेश्वर पुजाराची बायको पुजाने गुरुवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याचवेळी चेतेश्वर पुजाराच्या सौराष्ट्र संघाने विजय हजारे करंडकात बडोद्यावर मात करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे पुजारासाठी आपल्या मुलीचा जन्म हा दुहेरी आनंद मिळाल्यासारखा झाला आहे.

यावेळी चेतेश्वर पुजाराने आपली बायको पुजा आणि लहानग्या मुलीला सोबत घेऊन एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. क्रिकेटसोबत आपण आता वडिलांची जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार असल्याचं चेतेश्वरने म्हटलं आहे.

ही बातमी शेअर केल्यानंतर चेतेश्वर पुजाराच्या सहकाऱ्यांनीही ट्विटरवर त्याचं अभिनंदन केलं आहे.

काही महिन्यांपूर्वी चेतेश्वर पुजाराने आपण बाबा बनणार असल्याची बातमी ट्विटरवर शेअर केली होती.

रविवारी सौराष्ट्राची उपांत्य फेरीत आंध्र प्रदेशशी गाठ पडणार आहे. त्यामुळे या सामन्यात सौराष्ट्राचा संघ आणि चेतेश्वर पुजारा कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 4:05 pm

Web Title: cheteshwar pujara become father of a baby girl shares a picture with his daughter on twitter
टॅग : Cheteshwar Pujara
Next Stories
1 कोरिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची निवड, राणी रामपालकडे संघाचं नेतृत्व
2 श्रीलंकेतील तिरंगी टी-२० मालिकेत कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता
3 मुंबई ट्वेन्टी-२० लीग युवा खेळाडूंसाठी व्यासपीठ
Just Now!
X