पीटीआय, दोहा

तब्बल सहा वर्षांनी भारताने ‘फिफा’ विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पध्रेत पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात सुनील छेत्रीच्या दुहेरी गोलच्या योगदानामुळे सोमवारी भारताने बांगलादेशला २-० असे नामोहरम केले.

छेत्रीने ७९व्या मिनिटाला भारताचे खाते उघडून २०२३च्या आशिया चषक फुटबॉल स्पध्रेच्या तिसऱ्या पात्रता फेरीमधील स्थान मजबूत केले. दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या आशिक कुरुनियानने डावीकडून दिलेल्या क्रॉसच्या बळावर छेत्रीने दीर्घधाव घेत हेडरद्वारे हा गोल केला. त्यानंतर भरपाई वेळेत (९०+२  मिनिटाला) उजवीकडून सुरेश सिंगने दिलेल्या पासच्या बळावर आणखी एक गोल झळकावला. विश्वचषक पात्रता स्पध्रेत परदेशात २० वर्षांनी भारताला हा पहिला विजय मिळवता आला.

पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपल्यानंतर दुसऱ्या सत्रात छेत्रीने प्रतिस्पध्र्याचा बचाव भेदत पहिला गोल करीत बांगलादेशवर मानसिक दडपण आणले. त्यानंतर सामना संपण्याची शिटी वाजण्यापूर्वी आणखी एक गोल करीत प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांचा विश्वास सार्थ ठरवला. भारताने कतारकडून ०-१ अशी हार पत्करली होती.

विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा

७४ छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील आपली गोलसंख्या ७४पर्यंत नेली आहे.