14 November 2019

News Flash

China Open 2018 : पी व्ही सिंधू विजयी, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सिंधूने बुसानन हिला २१-२३, २१-१३, २१-१८ असे पराभूत केले

पी. व्ही. सिंधू (संग्रहीत छायाचित्र)

China Open 2018 : भारताच्या पी व्ही सिंधू हिने बुसानन हिला पराभूत करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आज २१-२३, २१-१३, २१-१८ असे पराभूत केले. पहिला गेम अटीतटीचा झाला. पण पहिल्या गेममध्ये सिंधूचा पराभव झाला. त्यानंतर सिंधूने जोरदार कमबॅक केले. तिने पुढील गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. तिने २१-१५ असा तो गेम जिंकून आपला अनुभव दाखवून दिला. मात्र तिसरा गेम पुन्हा एकदा रंगतदार झाला. सिंधू आणि बुसानन दोघींनी एकमेकांना स्पर्धेबाहेर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण अखेर सिंधूने २४-२२ अशा फरकाने सामन्यात विजय मिळवला. आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

त्याआधी, स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतने थायलंडच्या सुपन्यू अविहिंगसॅनन याला २१-१२, १५-२१, २४-२२ असे पराभूत केले. श्रीकांतसाठी ही लढत अतिशय महत्वाची ठरली. पहिल्या गेममध्ये भारताच्या श्रीकांतने २१-१५ असा विजय मिळवला. मात्र नंतरच्या गेममध्ये अविहिंगसॅनन याने पुनरागमन केले आणि त्याला १५-२१ अशी धूळ चारली. त्यामुळे तिसरा सेट हा अटीतटीचा होणार याची चाहत्यांना खात्री होती. त्यानुसार तो गेम रंगतदार झाला. अखेर श्रीकांतने २४-२२ असा विजय मिळवला.

First Published on September 20, 2018 6:44 pm

Web Title: china open 2018 sindhu defeated busanan 21 23 21 13 21 18 to enter the quarter finals
टॅग Pv Sindhu