News Flash

मी पुन्हा येतोय, जसप्रीत बुमराहने दिले पुनरागमनाचे संकेत

पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह सध्या संघाबाहेर

जसप्रीत बुमराह

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या पाठीच्या दुखापतीमधून सावरतो आहे. जसप्रीतने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक फोटो पोस्ट करत भारतीय संघात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. बुमराहच्या पाठीच्या दुखापतीला शस्त्रक्रियेची गरज लागणार नसल्याचं समोर आलं होतं. विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी मालिकेदरम्यान बुमराहला ही दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नव्हतं. आपल्या पाठीच्या दुखण्यावर उपचारासाठी बुमराह बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकासोबत इंग्लंडलाही गेला होता.

अवश्य वाचा – भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, बुमराहच्या दुखापतीवर शस्त्रक्रियेची गरज नाही !

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत बुमराहला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रियेची गरज नसल्याचा अहवाल दिल्यानंतर, आगामी काळात बुमराह संघात लवकरच पुनरागमन करु शकतो. २०२० साली भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनीही बुमराहच्या तब्येतीच्या घडामोडींवर समाधान व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 3:14 pm

Web Title: coming soon jasprit bumrah hints at comeback in indian side after injury psd 91
टॅग : Jasprit Bumrah
Next Stories
1 Dhoni Retires! एका हॅशटॅगमुळे धोनीचे चाहते झाले भावनिक
2 दिल्लीतल्या पहिल्या टी-२० सामन्यावर अतिरेकी हल्ल्याचं सावट, भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ
3 गांगुलीबाबत 12 वर्षांपूर्वी केलेली एक भविष्यवाणी खरी, अजून एक बाकी : सेहवाग
Just Now!
X