टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या भारतीय संघासमोर कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी एक मोठं संकट निर्माण झालं आहे. पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान हेल्मेटवर बॉल लागून आणि हॅमस्ट्रींग इंज्युरीमुळे दुखापतग्रस्त झालेला रविंद्र जाडेजा पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – Video : श्रेयसचा तो षटकार पाहून विराट कोहलीही झाला अचंबित

“ICC च्या नियमानुसार एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान डोक्याला मार लागला असेल तर त्याला किमान ७ ते १० दिवसांचा आराम करावा लागतो. ज्यामुळे तो ११ तारखेपासून सुरु होणाऱ्या सराव सामन्यात सहभागी होणार नाही. त्यामुळे सरावसामना खेळल्याशिवाय टीम इंडियाची मॅनेजमेंट जाडेजाला पहिल्या कसोटी सामन्यासाठी संधी देईल अशी शक्यता कमी आहे.” बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला माहिती दिली.

अवश्य वाचा – सूर्यकुमारला भारत सोडावा लागणार नाही, BCCI त्याच्या पाठीशी ! पाक खेळाडूने PCB ला फटकारलं

हेल्मेटला बॉल लागून झालेल्या दुखापतीपेक्षा रविंद्र जाडेजाची हॅमस्ट्रींग इंज्युरी अधिक चिंताजनक असल्याचं कळतंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यास तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.