देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली घरात आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत घरातच आहे.
अनुष्का शर्माने नुकताच व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का विचित्र आवाजात ओरडताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ –
अनुष्का शर्मा त्या व्हिडीओत कोहलीचं नाव जोरजोरात ओरडताना दिसत असून त्याला चौकार मारताना दिसत आहे. त्यावेळी असं वाटत की कोहली क्रिकेट खेळत आहे. पण तसं नसून कोहली शांत बसलेला आहे. त्यामुळे कोहलीदेखील तिच्याकडे फार विचित्र पद्धतीने बघताना दिसतो आहे.
दरम्यान, सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 4:10 pm