जगभरात सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू, त्यांचे सहकारी, संघ व्यवस्थापन आणि क्रिकेट बोर्डाचे सदस्य साऱ्यांनाच घरी बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरबसल्या काही लोक पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू देखील लक्ष वेधून घेत आहेत.

“कोणीही धोनीच्या रूममध्ये जावं, काहीही खायला मागवावं आणि…”; वाचा धमाल अनुभव

क्रिकेट विश्वातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC) अंतर्गत आयोजित करण्यात आलेले सर्व प्रकारचे क्रिकेट सामने सध्या रद्द करण्यात आले आहेत. काही मोठ्या जागतिक स्पर्धादेखील पुढे ढकलण्याची येण्याची शक्यता आहे. मैदाने ओस पडली असून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सुरू नसल्याने सध्या ICC च्या ट्विटर अकाऊंटवरून क्रिकेट प्रेमींसाठी विविध कोडी घालण्यात येत आहेत. ICC नुकतेच एक फोटो पोस्ट करत कोडं घातलं होतं. फोटोमध्ये भव्य मैदानावर एक पाठमोरा खेळाडू उभा होता. त्याने कसोटी क्रिकेटपटू घालतात तसे पांढरे कपडे परिधान केले होते. त्या क्रिकेटपटूच्या फोटोवर कॅप्शनमध्ये ‘केवळ एक कसोटी अर्धशतक आणि स्विंग गोलंदाजीचा उत्तमपैकी जाणकार’ अशा त्या खेळाडू संबंधीच्या काही गोष्टी दिल्या होत्या आणि खेळाडू ओळखायला सांगण्यात आले होते.

“विराट सर्वोत्तम वाटणाऱ्यांनी बाबर आझमची फलंदाजी बघा”

तो खेळाडू ओळखण्यासाठी अनेकांनी त्या पोस्टवर उत्तरे लिहिली. अनेकांनी त्यात असलेल्या खेळाडूच्या आकडेवरीसहित त्याचा फोटोदेखील पोस्ट केला. त्यानंतर ICC ने त्या कोड्याचं बरोबर उत्तर असलेला फोटो पोस्ट केला. तसेच, तुमच्यापैकी अनेकांनी त्या खेळाडूचं नाव बरोबर ओळखलं असं म्हणत ICC ने ट्विटरवरून त्यांचं अभिनंदन देखील केलं. त्या फोटोतील कोड्याचं बरोबर उत्तर म्हणजेच तो खेळाडू होता…जेम्स अँडरसन!

जेम्स अँडरसनने आतापर्यंत फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. पण गोलंदाजीत त्याच्यासारखे स्विंग गोलंदाजी करणारे खूप कमी गोलंदाज आहेत. अँडरसनने आतापर्यंत १८१ कसोटी सामन्यांमध्ये ५८४ गडी बाद केले आहेत. याशिवाय त्याने १९४ वन डे सामन्यांत २६९ तर टी २० कारकिर्दीत १८ बळी घेतले आहेत.