12 July 2020

News Flash

हिकेनला न्यायालयाचा दिलासा नाहीच

रणजी सामन्यादरम्यान मुंबईच्या संघातील सहकारी व राजस्थान रॉयल्सचा खेळाडू प्रवीण तांबेला आयपीएलमधील सामना निश्चितीचा प्रस्ताव ..

| August 13, 2015 06:41 am

रणजी सामन्यादरम्यान मुंबईच्या संघातील सहकारी व राजस्थान रॉयल्सचा खेळाडू प्रवीण तांबेला आयपीएलमधील सामना निश्चितीचा प्रस्ताव दिल्याप्रकरणी बीसीसीआयकडून निलंबित करण्यात आलेला मुंबईचा डावखुरा फलंदाज हिकेन शाहला कुठलाही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. शाहवर ठेवण्यात आलेला आरोप गंभीर स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.
बीसीसीआयच्या निर्णयाला हिकेनने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. निलंबनाचा निर्णय सुनावण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात आली नाही, असा दावा त्याने याचिकेत केला होता. तसेच त्याच आधारे निलंबनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.
न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर या बुधवारी याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. मात्र याप्रकरणी तो बीसीसीआयच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे दाद मागू शकतो, अशी सूचनाही न्यायालयाने केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2015 6:41 am

Web Title: court deny to mercy hiken
टॅग Ipl
Next Stories
1 प्रो कबड्डी लीग : यू मुंबाची विजयी घोडदौड कायम
2 आयपीएलच्या धर्तीवर स्नूकर, बिलियर्ड लीग शक्य -अडवाणी
3 भारताचा दमदार पलटवार
Just Now!
X