News Flash

अंबाती रायडूकडून वृद्धास मारहाण, व्हिडिओ व्हायरल

हा सर्व प्रकार हैदराबादमध्ये घडल्याची चर्चा

अंबाती रायडू

भारतीय क्रिकेटर अंबाती रायडूचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रायडू एका वृद्धाला मारहाण करताना दिसतो आहे. हा सर्व प्रकार हैदराबादमध्ये घडल्याची चर्चा आहे. अंबाती रायडू वेगाने गाडी चालवत असताना रस्त्यावरील वयोवृद्धाने रायडूला उद्देशून काही तरी सुनावले. या प्रकारानंतर दोघांच्यात वादाला सुरुवात झाली. रायडू गाडीतून उतरुन खाली आला. यावेळी आजूबाजूला असणाऱ्या अनेक लोकांनी दोघांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित व्यक्ती पुन्हा पुन्हा काहीतरी सुनावत असल्याचा राग मनात धरुन रायडूने त्याला फटके देण्यास सुरुवात केली.

या घटनेचा व्हिडिओ ‘एएनआय’ने जारी केला आहे. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अंबाती रायडूने ३४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यात त्याने १०५५ धावा केल्या आहेत. याशिवाय तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसतो. झिम्बाब्वेविरुद्ध तो अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 5:04 pm

Web Title: cricketer ambati rayudu seen in scuffle with a man allegedly after argument over rash driving in hyderabad
Next Stories
1 शारापोव्हाचा संघर्ष
2 Pro Kabaddi Season 5 – सांगलीच्या काशिलींगचा धडाका, यू मुम्बाची जयपूरवर मात
3 Pro Kabaddi Season 5 – तेलगू टायटन्सची तामिळ थलायवाजवर मात
Just Now!
X