News Flash

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा रियाल माद्रिदला रामराम, युवेंटस क्लबकडून नवीन इनिंग

रोनाल्डोसाठी युवेंटस क्लबने ११७ मिलियन डॉलर रक्कम मोजली

ख्रिस्तीयानो रोनाल्डोची नवीन इनिंग

फुटबॉलचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं अखेर रियाल माद्रिद या क्लबला रामराम ठोकला आहे. रोनाल्डो आता इटलीच्या युवेंटस संघाकडून नवी इनिंग सुरु करणार आहे. रोनाल्डोसाठी युवेंटस क्लबनं ११७ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मोजली असल्याची माहिती मिळते आहे. २००९ साली रोनाल्डो रियाल माद्रिद संघात दाखल झाला होता, त्यावेळी तो जगातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता. ३३ वर्षीय रोनाल्डोनं गेल्या नऊ वर्षात रियाल माद्रिदसाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

रोनाल्डोनं रियाल माद्रिदकडून खेळताना ४५० गोल झळकावण्याचा विक्रम रचला. तसेच रियाल माद्रिदसाठी त्यानं ४ युएफा चॅम्पियन्स लीग, ३ क्लब वर्ल्ड कप, २ ला लीगा, २ कोपा डेल रे, २ स्पॅनिश सुपर कप आणि २ युएफा सुपर कप जिंकण्याचा पराक्रम गाजवला. गेल्या ९ वर्षात रोनाल्डोनं चारवेळा बॅलन डीओर पुरस्कार जिंकला आहे. आता युवेंटसकडून खेळतानाही रोनाल्डो अशीच दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा त्याचे चाहते करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2018 10:00 pm

Web Title: cristiano ronaldo joins serie a champions juventus for reported 100 million euros
टॅग : Cristiano Ronaldo
Next Stories
1 वन-डे क्रिकेटमध्ये कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी – सौरव गांगुली
2 नेपाळला प्रतिस्पर्धी मिळाला, नेदरलँडविरुद्ध २ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार
3 बनावट डिग्री प्रकरणात हरमनप्रीत कौरची डीएसपी पदावरुन हकालपट्टी – सूत्रांची माहिती
Just Now!
X