News Flash

इंडियन ग्रां. प्रि.चा ‘फॉम्र्युला’ अयशस्वी

सेबॅस्टियन वेटेलची हॅट्ट्रिक आणि सलग चौथ्या विश्वविजेतेपदाच्या जल्लोषानंतर इंडियन ग्रां. प्रि.चा तिसरा सोहळा पार पडला तरी आता चिंता लागून राहिली आहे

| October 29, 2013 05:24 am

सेबॅस्टियन वेटेलची हॅट्ट्रिक आणि सलग चौथ्या विश्वविजेतेपदाच्या जल्लोषानंतर इंडियन ग्रां. प्रि.चा तिसरा सोहळा पार पडला तरी आता चिंता लागून राहिली आहे ती भारतातील पुढील फॉम्र्युला-वन पर्वाची. दर वर्षी प्रेक्षकसंख्येत होणाऱ्या घसरणीमुळे इंडियन ग्रां. प्रि.चा फॉम्र्युला अयशस्वी ठरला की काय, अशीच चर्चा सध्या वेगाच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे.
भारतात फॉम्र्युला-वनचा चाहतावर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळेच २०११मध्ये झालेला पहिला मोसम चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तुफान यशस्वी ठरला होता.
तब्बल ९५ हजारांच्या उपस्थितीमुळे भारताकडे मोठय़ा अपेक्षेने पाहिले जात होते. पण अपेक्षांच्या फुग्यातील हवा पुढच्या वर्षी विरळ होत गेली. २०१२मध्ये प्रेक्षकसंख्येत तब्बल ३० हजारांनी घट नोंदवली गेली. प्रेक्षकांची रोडावलेली संख्या, करसवलतीत न मिळालेली सूट, व्हिसा मिळण्यात होणाऱ्या अडचणी यामुळे २०१४च्या मोसमात इंडियन ग्रां. प्रि.ला स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना बुद्ध इंटरनॅशनल सर्किटकडे आकर्षित करण्यासाठी संयोजक जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनलने विविध योजना राबवल्या. तिकिटांची रक्कम कमी करण्याबरोबरच प्रेक्षकांना विविध आमिषे दाखवण्यात आली. यापुढे भारतात फॉम्र्युला-वन शर्यत होणार नाही, अशी भीतीही चाहत्यांना होती. तरीही रविवारी झालेल्या शर्यतीला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून संयोजकांवर चिंता करण्याची वेळ आली आहे.
तिसऱ्या मोसमात जवळपास ५० हजारच प्रेक्षकांनी फॉम्र्युला-वन शर्यतीचा आनंद लुटला. पण दर वर्षी कमी होत चाललेल्या प्रेक्षकसंख्येची दखल आता जागतिक ऑटोमोबाइल महासंघानेही (फिया) घेतली आहे. त्यामुळे आता इंडियन ग्रां. प्रि.चे भवितव्य ‘फिया’च्या निर्णयावर अवलंबून आहे. याविषयी जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ‘‘प्रेक्षकांच्या संख्येत या वर्षीही घट झाली, ही खरी गोष्ट असली तरी त्याचा कोणताही फरक पडणार नाही.
जेपी स्पोर्ट्सने भारतात पाच शर्यती आयोजित करण्याचा करार ‘फिया’शी केला आहे. त्यामुळे २०१५च्या सुरुवातीला इंडियन ग्रां. प्रि. शर्यत नक्कीच होईल, अशी आशा आहे. आम्ही सर्व अडचणींवर मात करू, असा विश्वास आहे.’’

वर्ष             प्रेक्षकसंख्या
२०११             ९५०००
२०१२             ६५०००
२०१३             ५००००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2013 5:24 am

Web Title: crowed low response seems indian grand formula race failed
टॅग : Indian Grand Prix
Next Stories
1 एमसीएकडून सचिनला हृद्य निरोप
2 शेवटच्या मालिकेत सचिनच्या शतकाला महत्त्व नाही-द्रविड
3 टोरेसची कमाल
Just Now!
X