सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात चांगला यष्टीरक्षक कोण असा प्रश्न विचारला तर बहुतांश लोक महेंद्रसिंह धोनीचं नाव घेतली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी सध्या वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळतो आहे. यष्टींमागे धोनीची चपळाई, फलंदाजांना यष्टीचीत करताना अंगातला विजेचा वेग या सर्व गोष्टींमुळे धोनी अजुनही तरुणाईच्या मनात घर करुन आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार टीम पेनला हे मान्य नाही. त्याच्या मते इंग्लंडचा जोस बटलर हा सध्याच्या घडीला मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे. नुकत्याच पार पडलेल्या वन-डे मालिकेत टीम पेनच्या ऑस्ट्रेलिया संघाला ५-० असा पराभव पत्करावा लागला होता.

अखेरच्या वन-डे सामन्यात जोस बटलरच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने अखेरचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिला. जोस बटलरच्या खेळाबद्दल विचारलं असता टीम पेन म्हणाला, ” जोस बटलरने सर्वोत्तम खेळ केलाय. सध्याच्या घडीला मर्यादीत षटकांच्या सामन्यात जोस बटलर उत्कृष्ठ यष्टीरक्षक-फलंदाज आहे. सध्या बटलरला आव्हान देईल असा एकही खेळाडू मला दिसत नाही. महेंद्रसिंह धोनीही चांगला यष्टीरक्षक-फलंदाज आहे. मात्र जोस वन-डे क्रिकेटमध्ये परिस्थिती ओळखून फलंदाजी करतो. त्याने स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय.”

loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
Guru Asta 2024
३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
is it wrong to expect rich husband
‘श्रीमंत नवरा पाहिजे’, अशी अपेक्षा महिलांनी जोडीदाराकडून ठेवणे चुकीचे आहे का?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जोस बटलरने ५ सामन्यांमध्ये २७५ धावांची खेळी केली. या खेळीत ९१, ५४, ११० अशा तीन नाबाद खेळींचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात २०६ या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडचा संघ ५०/५ अशा बिकट परिस्थीतीत सापडला होता. मात्र बटलरच्या शतकाने इंग्लंडने अखेरच्या सामन्यातही विजय संपादन केला. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतानाही बटलरने चमकदार कामगिरी केली होती.