जागतिक हॉकी लीगमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय महिला संघापुढे त्यांची हुकमी खेळाडू दीपिका कुमारीच्या दुखापतीची समस्या उभी राहिली आहे.
भारताने साखळी लढतीत शनिवारी विश्वचषक रौप्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-४ असा पराभव स्वीकारला. या लढतीमधील शेवटच्या डावात दीपिकाच्या डाव्या हाताला मोठी दुखापत झाली. वेदना असह्य़ झाल्यामुळे तिने मैदान सोडले. ‘‘दीपिकाच्या हाताला  फॅ्रक्चर झालेले नाही. महत्त्वाच्या लढतीसाठी अद्याप दोन दिवस बाकी असल्यामुळे तोपर्यंत ती तंदुरुस्त होईल अशी मला खात्री आहे,’’ असे भारताचे व्यवस्थापक सी. आर. कुमार यांनी सांगितले.