करोना साथीच्या काळात आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला मंगळवारपासून डेन्मार्क खुल्या स्पर्धेद्वारे सुरुवात होत आहे. करोनामुळे सात महिने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा ठप्प होत्या.

सायना नेहवाल आणि पी. कश्यप यांनी नुकतीच या स्पर्धेतून माघार घेतल्याने भारताची भिस्त किदम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्यावर आहे.

श्रीकांतने २०१७मध्ये डेन्मार्क स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. लक्ष्यने गेल्या वर्षी पाच विजेतेपद पटकावत त्याची गुणवत्ता सिद्ध केली होती. अजय जयराम आणि शुभांकर दे यांच्याकडूनही स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या वर्षी होणारी ही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधील एकमेव स्पर्धा आहे.