ब्यूनस आयर्स : दिवंगत महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाच्या दुसऱ्या डॉक्टरांचीही चौकशी अर्जेटिनाच्या पोलिसांकडून करण्यात आली.

मॅराडोनाचे मानसोपचारतज्ज्ञ ऑगस्टिना कोसाचोव यांच्या कार्यालयाची आणि घराची झाडाझडती घेऊन अर्जेटिनाच्या पोलिसांनी चौकशी केली. अर्जेटिनाच्या अ‍ॅटर्नी जनरलकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार मॅराडोनाच्या डॉक्टरांची चौकशी त्या देशातील पोलिसांकडून करण्यात येत आहे. मॅराडोनाचा गेल्या आठवडय़ात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याआधी नोव्हेंबरमध्ये मॅराडोनाच्या मेंदूतील गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेच्यावेळेस चौकशी करण्यात आलेले मानसोपचारतज्ज्ञ कोसाचोवही उपस्थित होते. त्यामुळे ते देखील पोलिसांच्या चौकशी प्रक्रियेचा भाग बनले.