भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकच्या वन-डे क्रिकेटमधली भविष्याबद्दल धाडसी विधान केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे संघात दिनेश कार्तिकला स्थान मिळालं नाहीये. त्यामुळे भविष्यकाळात कार्तिकची वन-डे कारकिर्द संपुष्टात आल्यात जमा आहे, यापुढे त्याचा टी-20 क्रिकेटसाठी विचार केला जाईल. ESPNCricinfo या संकेतस्थळाशी बोलत असताना मांजरेकरांनी आपलं मत मांडलं.

“ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे मालिकेसाठी संघात निवड न झाल्यामुळे दिनेश कार्तिकच्या चाहत्यांना वाईट वाटणं साहजिक आहे. आतापर्यंत त्याला ज्या ज्या सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, त्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आहे. मात्र वन-डे मालिकेसाठी निवड न झाल्यामुळे यापुढे दिनेश कार्तिकचा फक्त टी-20 मालिकेसाठी विचार केला जाईल. त्याची वन-डे क्रिकेटमधली कारकिर्द आता जवळपास संपुष्टात आली आहे”, मांजरेकर दिनेश कार्तिकच्या संघात समावेशा न होण्याबद्दल बोलत होते.

अवश्य वाचा – इंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत

24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत भारत 2 टी-20 आणि 5 वन-डे सामने खेळणार आहे. विश्वचषकासाठी निवड समितीने 18 जणांचा संभाव्य संघ निश्चीत केला आहे. त्यामुळे विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात दिनेश कार्तिकची निवड होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – कसोटी संघात संधी मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला – हनुमा विहारी