News Flash

दीपिकाची आगेकूच, जोत्स्ना पराभूत

सहाव्या मानांकित कॉवीने हा सामना १२-१०, ११-६, ११-५ असा जिंकला. तिला आता दीपिकाशी खेळावे लागणार आहे.

दीपिका पल्लिकल

भारताच्या दीपिका पल्लिकलने चौथ्या मानांकित अ‍ॅलिसन वॉटर्सवर मात करीत फिलाडेल्फिया येथे सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या स्क्वॉश स्पर्धेत आगेकूच केली. मात्र, तिची सहकारी जोत्स्ना चिनप्पाचे आव्हान संपुष्टात आले. दीपिकाने इंग्लंडच्या अ‍ॅलिसनला ९-११, ११-५, ३-११, ११-१, ११-६ असे हरवले. चिनप्पाला मात्र इजिप्तच्या ओम्नेया अ‍ॅब्देल कॉवीने पराभूत केले. सहाव्या मानांकित कॉवीने हा सामना १२-१०, ११-६, ११-५ असा जिंकला. तिला आता दीपिकाशी खेळावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2015 1:49 am

Web Title: dipika pallikal progresses joshna chinappa loses at us open squash
Next Stories
1 विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी स्पर्धा : ब्राझील विजयी, अर्जेटिनाची पॅराग्वेशी बरोबरी
2 भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याची संधी – ब्रायन लारा
3 राजधानीत पेलेंचे जल्लोषात स्वागत
Just Now!
X