पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. तब्बल ३ दशकांच्या संघर्षानंतर अखेरीस हा दिवस उजाडल्यामुळे देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनानंतर भाषणादरम्यान सांगितलं. आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असं सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरही आज अनेक सेलिब्रेटी राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानेही राम मंदिर भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केला असून, या निमीत्ताने द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका असं आवाहनही कैफने केलं आहे. भगवान श्रीराम यांच्यासाठी सर्वजण प्रिय होते, आपणही त्यांचा वारसा पुढे चालू ठेवायला हवा अशा आशयाचं ट्विट कैफने केलं आहे.

दरम्यान भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही, “आपल्याला सर्वांच्या भावनांची काळजी घ्यायची आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन, विश्वास घेऊन विकास करायचा आहे,” असं सांगितलं.