News Flash

दुबई पॅराबॅडमिंटन स्पर्धा : भगत, कदम अंतिम फेरीत

अंतिम फेरीत त्याची भारताच्याच कुमार नितेशशी गाठ पडणार आहे.

भारताच्या प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी शनिवारी दुबई पॅराबॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ‘एसएल३’ पुरुष एकेरी गटात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या प्रमोदने मलेशियाच्या मुहम्मद हुझैरी अब्दुल मालिकचा २१-७, २१-१७ असा परभव केला. अंतिम फेरीत त्याची भारताच्याच कुमार नितेशशी गाठ पडणार आहे.

पुरुष दुहेरीत प्रमोदने मनोज सरकारच्या साथीने मोहम्मद अरवाज अन्सारी आणि दीप रंजन बिसोई या भारताच्या जोडीचा २१-१९, २३-२१ असा पाडाव केला. अंतिम फेरीत त्यांची सुकांत आणि कुमार जोडीशी गाठ पडेल. मिश्र दुहेरीत प्रमोद आणि पाला कोहली जोडीने फ्रान्सच्या ल्युकास मझूर आणि फौस्टिन नोएल जोडीकडून १७-२१, ५-२१ अशी हार पत्करली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 12:03 am

Web Title: dubai para badminton tournament final round akp 94
Next Stories
1 इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल : बलाढ्य चेल्सीचा दारुण पराभव
2 रविवार विशेष : आता परीक्षा ऑलिम्पिकची!
3 मोठी बातमी…CSKच्या गटात करोनाचा शिरकाव!
Just Now!
X