वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने निवृत्तीच्या निर्णयावरून यु-टर्न घेतला आहे. गेल्या वर्षी २५ ऑक्टोबरला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्राव्होने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ब्राव्हो वेस्ट इंडिज संघाकडून कधीही खेळणार नाही हे स्पष्ट होते. पण शुक्रवारी ब्राव्होने निवृत्तीच्या निर्णयावरून माघार घेतली. पण तो केवळ टी २० क्रिकेट खेळणार आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील त्याचा निवृत्तीचा निर्णय त्याने कायम ठेवला आहे. मात्र विंडीज क्रिकेट मंडळातील प्रशासकीय बदलांमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

टीम इंडियाला वन-डे मालिकेआधी धक्का; ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

माझ्या पुनरागमनाच्या निर्णयामुळे मी एकदिवसीय आणि कसोटी सामनेही खेळणार का असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण मी स्पष्ट करतो की मी एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेटमध्ये परतणार नाही. मला वेस्ट इंडिजसाठी केवळ टी २० क्रिकेट खेळायचे आहे. माझ्या मनात हा विचार खूप दिवसांपासून होता. अखेर क्रिकेट मंडळाच्या प्रशासकीय स्तरावरील बदलांमुळे मी टी २० मध्ये परतण्याचा विचार केला. मी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. टी २० क्रिकेट खेळण्यासाठी मी खूपच आतुर आहे. मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या चाहत्यांना आणि माझ्या नातेवाईकांना धन्यवाद”, असे ब्राव्होने स्पष्ट केले.

IPL 2020 Auction : स्टेन, मॅक्सवेल, उथप्पासह ३३२ खेळाडूंवर लागणार बोली

निवृत्तीच्या वेळी काय म्हणाला होता ब्राव्हो?

विंडीजच्या या ३६ वर्षीय खेळाडूने आपल्या निवृत्तीसंदर्भात एक पत्रक जारी केले होते. ‘सर्व क्रिकेट जगताला मला सांगायचे आहे की आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. १४ वर्षांपूर्वी मी क्रिकेटच्या मैदानावर वेस्ट इंडिजच्या संघासाठी पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. आजही मला तो क्षण स्पष्टपणे आठवतोय जेव्हा जुलै महिन्यात २००४ साली इंग्लंडविरुद्धच्या लॉर्डस मैदानावरील सामन्याआधी मला विडिंजच्या संघाची मरुन रंगाची टोपी देण्यात आली होती. त्यावेळी माझ्यात असणारा उत्साह आणि खेळाबद्दलचे प्रेम मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कायम ठेवले याचा मला आनंद आहे’ असे ब्रॉव्होने पत्रकात नमूद केले होते.

IPL 2020 Auction : जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण, कधी आणि कुठे दिसणार?

टी२० कारकीर्द –

सामने – ६६
धावा – १,१४२
सरासरी – २४.२९
बळी – ५२
सर्वोत्तम कामगिरी – २८ धावांत ४ बळी