News Flash

VIDEO : आत्तापर्यंतचा सर्वात मोठा षटकार?, इंग्लंडच्या फलंदाजाचा ‘गगनचुंबी’ फटका पाहून सर्व झाले स्तब्ध

'त्याने' मारलेला षटकार स्टेडियमच्याही बाहेर गेला

लियाम लिव्हिंगस्टोनने खेचला गगनचुंबी षटकार

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना काल १८ जुलै रोजी लीड्सच्या हेडिंग्ले येथे खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानला ४३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजीसाठी करताना इंग्लंडने १९.५ षटकांत सर्वबाद २०० धावा केल्या. या मालिकेच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनने या सामन्यातही जबरदस्त फलंदाजी केली. लिव्हिंगस्टोनने २३ चेंडूत ३८ धावा केल्या आणि तीन शानदार षटकारही ठोकले. यापैकी त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस राऊफला मारलेला षटका आरपार गेला. हा चेंडू स्टेडियमच्याही बाहेर गेला.

इंग्लंड क्रिकेटने लिव्हिंगस्टोनने मारलेल्या या षटकाराचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. लिव्हिंगस्टोनच्या या षटकाराची मोठी चर्चा होत आहे, काही लोक टी-२० क्रिकेटमधील हा सर्वात मोठा षटकार असल्याचेही म्हणत आहेत. या सामन्यात इयान मॉर्गन खेळत नसल्याने जोस बटलरने इंग्लंडचे नेतृत्व केले. बटलरने ३९ चेंडूत ५९ धावा केल्या. मोईन अलीने १६ चेंडूत ३६ धावांची शानदार खेळी साकारली.

 

हेही वाचा – “द्रविड कोच असता तर करण जोहरची ‘ते’ करायची हिंमत झाली नसती”

इंग्लंडकडून बटलर, मोईन आणि लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानकडून हॅरिस राऊफने दोन गडी बाद केले, तर फलंदाजी करताना ४८ धावाही व्यतीत केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान २० षटकांत ९ बाद १५५ धावा करू शकला. साकीब महमूदने तीन तर मोईन अलीने दोन गडी बाद केले. या विजयासह इंग्लंडने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 2:45 pm

Web Title: eng vs pak liam livingstone hits a huge six out of th park adn 96
Next Stories
1 “…म्हणून मी ODI कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला”; ईशान किशनने सांगितलं ‘रिटर्न गिफ्ट’ कनेक्शन
2 काँग्रेस नेते संजय निरुपम यांना वाटतेय ऑलिम्पिकच्या आयोजनाची भीती, म्हणाले…
3 “द्रविड कोच असता तर करण जोहरची ‘ते’ करायची हिंमत झाली नसती”
Just Now!
X