News Flash

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित झालेल्या खेळाडूसाठी चक्क पंतप्रधानांचा पुढाकार!

पंतप्रधानांनी आपल्याच क्रिकेट बोर्डाला फटकारले

ओली रॉबिन्सन आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला आपल्या जुन्या वादग्रस्त ट्वीटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या निलंबनानंतर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन त्याच्यासाठी धावून आले. जॉनसन यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डावरही फटकारले आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घातली, यावर पंतप्रधान जॉनसन आणि कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डोडन यांनी नाराजी व्यक्त केली.

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचे प्रवक्ते ऑलिव्हर डोडन यांनी ट्वीट केले, ”ओली रॉबिन्सनचे ट्वीट अवमानकारक आणि चुकीचे होते. पण ती जवळपास एक दशक जुनी गोष्ट होती आणि एका तरुण मुलाने ती चूक केली होती. तो तरुण मुलगा आता एक मोठा माणूस झाला असून त्याने माफी मागितली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ओली रॉबिन्सनला निलंबित करून हे चुकीचे केले आहे आणि त्याबद्दल त्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे.” इंग्लंडचे पंतप्रधान आणि राज्य सचिव यांनी पाठिंबा दिल्यानंतर आता हे प्रकरण आणखीन रंजक बनले आहे.

हेही वाचा – मेस्सीला हरवण्यात अनेकजण अपयशी ठरले, पण एका भारतीयाने त्याला मागे टाकले!

 

रॉबिन्सनने मागितली माफी

रॉबिन्सनने आपल्या आठ वर्षांपूर्वीच्या ट्वीटबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. किशोरवयीन म्हणून चूक केल्याचे त्याने म्हटले होते. अलीकडेच भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विननेही रॉबिन्सनच्या विषयावर आपले मत व्यक्त केले. ”कसोटी कारकीर्दीला उत्कृष्ट सुरुवात केल्यावर त्याला निलंबित केल्याबद्दल मला खरोखर वाईट वाटते. सोशल मीडिया पिढीसाठी भविष्यात काय आहे याचा हा एक मजबूत संकेत आहे.”

हेही वाचा – एका भारतीय व्यक्तीची वार्षिक कमाई म्हणजे रोहित शर्माचे ‘इतक्या’ तासांचे उत्पन्न!

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात रॉबिन्सनने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेतले. यामध्ये त्याने केन विलियम्सन, रॉस टेलर, टॉम लॅथम या खेळाडूंना तंबूत धाडले होते. रॉबिन्सनने आत्तापर्यंत ६४ प्रथम श्रेणी सामने खेळताना २८६ बळी मिळवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 9:52 am

Web Title: england cricketer ollie robinson gets support of prime minister boris johnson adn 96
Next Stories
1 मेस्सीला हरवण्यात अनेकजण अपयशी ठरले, पण एका भारतीयाने त्याला मागे टाकले!
2 जोकोव्हिचचा झंझावात!
3 मेक्सिकोला नमवून अमेरिका अजिंक्य
Just Now!
X