News Flash

ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी हॉकीपटूंचा मोर्चा

हॉकीचे जादूगार म्हणून परिचित असलेले मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ द्यावा या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक ज्येष्ठ खेळाडू व चाहत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा नेला व मागणीचे

| January 9, 2014 03:24 am

हॉकीचे जादूगार म्हणून परिचित असलेले मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ द्यावा या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक ज्येष्ठ खेळाडू व चाहत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा नेला व मागणीचे निवेदन सादर केले.
ध्यानचंद यांचा मुलगा व माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अशोककुमार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात जफर इक्बाल, दिनेश चोप्रा, राजेश चौहान, माजी प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांच्यासह अनेक खेळाडूंनी भाग घेतला. अशोककुमार, के.अरुमुगम यांच्यासह अनेक खेळाडूंच्या सह्य़ा असलेले निवेदन पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.  सचिन तेंडुलकर याला भारतरत्न सन्मान देण्यात आल्यानंतर ध्यानचंद यांनाही हा मान मिळावा या मागणीला जोर वाढला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 3:24 am

Web Title: ex players march to pmo demand bharat ratna for dhyan chand
Next Stories
1 मुंबईच्या पहिल्या डावात ४०२ धावा; जहीरचा सामना करायला महाराष्ट्र सज्ज
2 बोपण्णा-कुरेशीची आगेकूच; पेस-स्टेपनाक पराभूत
3 ‘यूएई’मधील ‘त्या’ लीगशी संबंध नाही; बीसीसीआयचे स्पष्टीकरण