News Flash

WTC Final : विराट-रोहितसाठी ‘ही’ असणार चिंतेची बाब, दिलीप वेंगसरकरांनी दिलं मत

१८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार 'महामुकाबला'

दिलीप वेंगसरकर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी सराव सामन्यांचा अभाव ही विराट कोहलीसाठी फार मोठी चिंतेची बाब नाही, परंतु माजी कर्णधार आणि माजी निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांनी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले आहे. सरावाचा अभाव असल्यामुळे भारतीय कर्णधाराला त्याचा त्रास होऊ शकतो, असे वेंगसरकर यांनी सांगितले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ गुरुवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला.

‘‘विराट-रोहित चांगल्या लयीत, पण…”

या ऐतिहासिक सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. भारतासाठी ११६ कसोटी सामने खेळलेलेले वेंगसरकर म्हणाले, ”विराट कोहली बराच काळ टीमबरोबर होता आणि सध्या तो जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. कोहली आणि रोहित हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. चांगली गोष्ट म्हणजे दोघेही चांगल्या  लयीत आहेत. पण मला वाटते, की सामन्यांच्या अभ्यासाअभावी त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. इंग्लंड दौऱ्याच्या सुरुवातीच्या कसोटीतही याचा परिणाम होऊ शकतो. न्यूझीलंड संघ आधीच तेथे खेळत असल्याने त्याचा फायदा होईल.”

हेही वाचा –  महान क्रिकेटपटू सुनील गावसकर टीम इंडियाचे कोच का होऊ शकले नाहीत?

वेंगसरकर म्हणाले, ”भारत हा एक चांगला संघ असून उत्कृष्ट लयीत आहे. न्यूझीलंडचा फायदा हा आहे, की त्यांचा संघ जास्त चर्चेत राहत नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी ते दोन कसोटी सामने खेळत आहेत. त्यांना परिस्थितीशी जुळवून घेता येईल. भारतीय संघाने या कसोटीपूर्वी दोन-तीन सामने खेळले पाहिजे होते, जेणेकरून ते परिस्थितीशी जुळवून घेतील.”

”फलंदाजांसोबत गोलंदाजांनाही मैदानात वेळ घालवण्यासाठी सांगितले जाते. आपण भलेही नेट्समध्ये सराव करा पण, मैदानावर सामने खेळण्यात वेळ घालवणे नेहमीच फायद्याचे ठरते”, असेही वेंगसरकरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 4:45 pm

Web Title: ex selector dilip vengsarkar said that india lack of match practice may hurt virat kohli rohit sharma adn 96
Next Stories
1 महान क्रिकेटपटू सुनील गावसकर टीम इंडियाचे कोच का होऊ शकले नाहीत?
2 पाकिस्तानला मिळाला नवा ‘धोनी’..! १०० किलोचा ‘हा’ क्रिकेटपटू ठोकतो उत्तुंग षटकार
3 टीम इंडियाच्या लाडक्या ‘भज्जी’नं किचनमध्ये केली कमाल..! पाहा व्हिडिओ
Just Now!
X