27 September 2020

News Flash

प्रवेशपत्र नसल्याने फेडररलादेखील कोर्टवर प्रवेश नाकारला

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सहा वेळा जिंकणाऱ्या फेडररला ‘नियम म्हणजे नियम’ हा खाक्या अनुभवावा लागला.

रॉजर फेडरर

ज्याच्या नावावर २० ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत, त्या रॉजर फेडररलादेखील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या सुरक्षारक्षकांनी प्रवेशपत्र नसल्याने अडवले. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सहा वेळा जिंकणाऱ्या फेडररला ‘नियम म्हणजे नियम’ हा खाक्या अनुभवावा लागला.

फेडररही त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देता काही काळ थांबून राहिला. शनिवारी विश्रांतीच्या दिवशी फेडरर सरावासाठी निर्धारित कोर्टकडे जात असताना प्रवेशपत्र नसल्याने त्याला तेथील सुरक्षारक्षकांनी अडवले. अखेरीस त्याचे सहकारी आल्यानंतरच त्याचे प्रवेशपत्रासह त्याला सोडण्यात आले.

प्रत्येक तपासणीच्या ठिकाणी खेळाडूंनीदेखील त्यांचे प्रवेशपत्र दाखवण्याचा नियम प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. त्यामुळेच फेडररला थांबवल्यावर त्यानेदेखील नियमाला मुरड घालण्याचा प्रयत्न केला नाही. त्यातूनच फेडररचे महान खेळाडूबरोबरच महान माणूसपण अधोरेखित झाले.

‘विरुष्का’ची ‘फेडेक्स’ भेट!

कसोटीपाठोपाठ एकदिवसीय मालिकादेखील जिंकल्याने अत्यानंदात असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासह ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत प्रेक्षक म्हणून हजेरी लावत टेनिसचा मनमुराद आनंद  लुटला. यावेळी त्याने नोव्हाक जोकोव्हिच आणि डेनिस श्ॉपोव्हॅलोव यांचा तसेच सेरेना विल्यम्स व डायना यासत्रेमस्का यांच्यातील सामने पाहिले. तसेच कोहलीने त्याचा आवडता खेळाडू रॉजर फेडररला भेटून त्याच्यासमवेत एक छायाचित्र ‘ट्वीट’ केले आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील हे छायाचित्र आयोजकांकडून टाकण्यात आले असून त्याखाली ‘एका छायाचित्रात तीन महान व्यक्ती’ असे नमूद  केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 1:42 am

Web Title: federer also denied entry to the court because there was no signatory
Next Stories
1 चौकशी होईपर्यंत पंडय़ा-राहुलला खेळू द्यावे!
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : आदित्य-उमेशच्या गोलंदाजीमुळे विदर्भ उपांत्य फेरीत
3 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची आघाडी कायम
Just Now!
X