पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला गाड्यांबद्दल किती प्रेम आहे, हे सर्वांनाचा ठाऊक आहे. त्याच्याकडे विविध गाड्यांचे कलेक्शन आहे. इटलीचा अव्वल फुटबॉल क्लब जुव्हेंटसबरोबर खेळताना त्याने अनेक गाड्या घेतल्या आहेत. या क्लबचे प्रमुख एंद्रिया एंगेली यांनी रोनाल्डोला फेरारीच्या मुख्यालयात नेले, तिथे गेल्यानंतर रोनाल्डोने एक सुपरकारही खरेदी केली.

 

रविवारी सेरी-एमधील सामन्यात जुव्हेंटसला एसी मिलानकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर रोनाल्डो संघाचे पुढील प्रशिक्षण सोडून हेलिकॉप्टरने फेरारीच्या मुख्यालयात पोहोचला. तिथे रोनाल्डोने १.४ दशलक्ष युरो (सुमारे १२.५ कोटी रुपये) किंमतीची महागडी सुपरकार खरेदी केली. फेरारी मोंजा एसपी १ असे या गाडीचे नाव असून ही एक उत्कृष्ट स्पोर्ट्स सुपरकार आहे, जी आजकाल जगात सर्वत्र चर्चेत आहे.

 

रोनाल्डोने फेरारीचे एफ-१ चालक चार्ल्स लॅक्रॅक आणि कार्लोस सॅन्झ तसेच फॉर्म्युला वन फरारी स्पोर्ट्स कारसोबत फोटोसेशनही केले. यावेळी रोनाल्डोने या दोघांनाही स्वाक्षरी केलेली जर्सीही भेट म्हणून दिली.