News Flash

सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी २२ वर्षीय फुटबॉलपटूला अटक

पोलिसांनी या फुटबॉलपटूला त्याच्या घरातून अटक केली

प्रातिनिधिक फोटो

फ्रान्समधील अँगर्स या फुटबॉल क्लबचा खेळाडू असणाऱ्या फारीद इल मिलाली (Farid El Melali) याला पोलिसांनी अटक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी फारीद अश्लील चाळे करत असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली असली तरी त्यासंदर्भातील माहिती आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याआधीही फारीदला सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी अटक झाली होती. इएसपीएन या क्रिडा विश्वासंदर्भात वृत्तांकन करणाऱ्या वेबसाईटने यासंदर्भात बातमी दिली आहे.

२२ वर्षीय फारीदला यापूर्वीही अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करताना अटक झाली होती असं अनेक वृत्तपत्रांनी आपल्या वृत्तामध्ये नमूद केलं आहे. सध्याच्या प्रकरणामध्ये फारीद हा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये उभा राहून समोरच्या इमारतीमध्ये तळ मजल्यावर राहणाऱ्या महिलेकडे बघून हस्तमैथून करत होता असं इएसपीएनने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. हा सर्व प्रकार या महिलेच्या शेजऱ्यांनी पाहिला आणि त्यांनी पोलिसांना यासंदर्भात कळवले. त्यानंतर पोलिसांनी फारीदला त्याच्या घरुन अटक केली. फारीदच्या अटकेसंदर्भातील वृत्ताला स्थानिक पोलिसांनी आणि अँगर्स फुटबॉल क्लबनेही दुजोरा दिला आहे. फारीदने आपला गुन्हा कबुल केल्याचे ली पार्सीन या वेबसाईटने म्हटले आहे. फारीदला मंगळावारी जामीनावर सोडण्यात आलं आहे.

फारीदला सध्या सोडण्यात आलं असलं तरी त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे. या प्रकरणात त्याला शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र फारीदच्या वकिलांनी त्याला या महिलेच्या शेजाऱ्यांनी अश्लील कृत्य करताना पाहिलेलं नसल्याचा दावा केला आहे. फारीदने नुकताच अँगर्स क्लबबरोबरचा करार वाढवला असून आता तो २०२३ पर्यंत अँगर्ससाठी खेळणार आहे. मात्र आता या प्रकरणाचा या करारावर काही परिणाम होतो का?, क्लब फारीदवर कारवाई करतं का? या प्रश्नांची उत्तर काही दिवसांमध्ये स्पष्ट होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 11:14 am

Web Title: footballer farid el melali arrested for masturbating in public 2nd time he is been charged for such an act scsg 91
Next Stories
1 IPL : ‘या’ संघासाठी आम्ही दोन-दोन तास ‘प्लॅनिंग’ करतो – रोहित शर्मा
2 टी २० विश्वचषकाच्या संघात धोनीला स्थान; सुनील शेट्टीने निवडला संघ
3 पैलवान सुरेश रैनाचा भन्नाट फोटो पाहिलात का?
Just Now!
X