News Flash

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : नदालचा झंझावाती विजय

फ्रेंच स्पर्धा १० वेळा जिंकणाऱ्या नदालने अर्जेटिनाच्या गुईदो पेल्लाचा ६-२, ६-१, ६-१ असा फडशा पाडला.

| June 1, 2018 02:12 am

राफेल नदाल

चिलीच, मुगुरुझा, शारापोव्हा तिसऱ्या फेरीत; दुहेरीत युकी-दिविजची आगेकूच

पॅरिस : विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या मरीन चिलीच, डॉमिनिक थिम, मारिया शारापोवा, गर्बिन मुगुरुझा व कॅरोलीन वोझ्नियाकी यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले.  ‘लाल मातीचा बादशहा’ असलेल्या राफेल नदालने झंझावाती विजय मिळवत आगेकूच केली. भारताच्या युकी भांब्री व दिविज शरण यांनीही दुहेरीत विजयी वाटचाल कायम राखली.

फ्रेंच स्पर्धा १० वेळा जिंकणाऱ्या नदालने अर्जेटिनाच्या गुईदो पेल्लाचा ६-२, ६-१, ६-१ असा फडशा पाडला. नदालने अग्रमानांकनाला साजेसा खेळ करीत गुईदोचा बचाव निष्प्रभ केला. त्याच्या वेगवान फटक्यापुढे गुईदोला सव्‍‌र्हिस टिकवणे जड गेले.

तृतीय मानांकित चिलीचने हय़ुबर्ट हुकीझ याच्यावर ६-२, ६-२, ६-७ (३-७), ७-५ असा विजय मिळवला. अनपेक्षित निकाल नोंदवण्यासाठी ख्याती असलेल्या थिमने स्टिफानोस त्सित्सिपासचा ६-२, २-६, ६-४, ६-४ असा पराभव केला. १२वा मानांकित सॅम क्युएरीने गिलेस सिमोनचे आव्हान ६-१, ६-७ (३-७), ६-४, ६-१ असे संपुष्टात आणले. जिगरबाज  रिचर्ड गास्केटने आव्हान राखताना मॅलेक जाझिरीला ६-२, ३-६, ६-३, ६-० असे हरवले. १८वा मानांकित फॅबिओ फोगनानीला एलियाझ येमेरविरुद्ध ६-४, ६-१, ६-२ असा सफाईदार विजय मिळवला.

एकेरीत पराभूत झालेल्या युकीने दुहेरीत दिविजच्या साथीने पुरव राजा (भारत) व फॅब्रिस मार्टिन (फ्रान्स) जोडीचा ६-३, ५-७, ६-४ असा पराभव केला.

महिलांमध्ये तृतीय मानांकित मुगुरुझाने फिओना फेरोवर ६-४, ६-३ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळाला. अनुभवी समंथा स्टोसूरने अनास्ताशिया पॅव्हलिचेन्कोववर ६-२, ७-६ (७-१) असा विजय मिळवला. माजी विजेत्या शारापोव्हाने डोना व्हेकिकला ७-५, ६-४ असे हरवले. द्वितीय मानांकित कॅरोलीन वोझ्नियाकीने जॉर्जिया गार्सिया लोपेझला ६-१, ६-० असे हरवले. १९व्या मानांकित मॅगडेलिना रिबारीकोवाने बेलिंडा बेन्किकची अनपेक्षित विजयाची मालिका ६-२, ६-४ अशी खंडित केली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 2:12 am

Web Title: french open top seed rafael nadal enter into round three
Next Stories
1 तिशी ओलांडलेल्या खेळाडूंनी गाजवली यंदाची आयपीएल
2 सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी
3 भारताशी खेळण्यासाठी आधी अफगाणिस्तनाशी क्रिकेट खेळण्याची BCCIची अट
Just Now!
X