02 March 2021

News Flash

गौतम गंभीरला टेलिव्हिजनवर क्रिकेट किंवा फुटबॉल नाही, तर हा खेळ पाहायला जास्त आवडतो

विश्वचषक विजेत्या भारतीय संघात गौतम गंभीरचे योगदान महत्त्वाचे होते.

गंभीरने क्रिकेट खेळाला वाहून घेतले असले तरी तो क्रिकेट व्यतिरिक्त हॉकी या खेळाचा खूप मोठा चाहता आहे

गौतम गंभीरचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्वत: गौतम गंभीर देखील पुनरागमनामुळे खूष आहे. विशेष म्हणजे, गौतम गंभीरचा आज ३५ वा वाढदिवस आहे. गौतम गंभीरने इंदूर कसोटीत अर्धशतकी खेळी साकारून मिळालेल्या संधीचे सोने देखील केले. विश्वचषक विजेत्या भारतीय संघात गौतम गंभीरचे योगदान महत्त्वाचे होते. क्रिकेट खेळणे ही गंभीरची केवळ आवड नसून त्याच्या रक्तात क्रिकेट वाहते, असेही अनेक माजी क्रिकेटपटू म्हणाले होते. गेल्या दोन वर्षांपासून गंभीर भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी झगडत होता. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार खेळी करून गंभीरने आपली योग्यता सिद्ध करून दाखवली.

गंभीरने क्रिकेट खेळाला वाहून घेतले असले तरी तो क्रिकेट व्यतिरिक्त हॉकी या खेळाचा खूप मोठा चाहता आहे. खुद्द गंभीरने याबद्दलची माहिती दिली. फावल्या वेळात आपण टेलिव्हिजनवर क्रिकेट किंवा फुटबॉल सामना पाहण्यापेक्षा हॉकी सामना पाहणे मला जास्त आवडते, असे गंभीर म्हणाला. मी भारतीय हॉकी संघाचा खूप मोठा चाहता आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे सर्व सामने मी पाहिले होते. भारतीय संघाला पदक जिंकता आले नसले, तरी संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. भारतीय हॉकीचा आलेख चढता राहावा हिच आशा आहे. ८० च्या दशकात हॉकी विश्वात भारतीय संघाची जशी दहशत होती, तशी दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली पाहिजे. जर टेलिव्हिजनवर क्रिकेट, फूटबॉल किंवा हॉकीचे सामने सुरू असतील, तर मी नक्कीच हॉकीचा सामना पाहण्याचा प्राधन्य देतो, असेही गंभीर पुढे म्हणाला.
सराव आणि व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाल्यानंतर आपल्या मुलीसोबत वेळ व्यतित करण्यास आवडते. चित्रपट पाहण्याचीही आवड असल्याचे यावेळी गंभीर म्हणाला. दुलीप करंडक स्पर्धेत व्यग्र असल्याने मला ठरवून एखादा चित्रपट पाहता आला नाही. जसा फावला वेळ मिळेल आणि त्यावेळात जो चित्रपट समोर असेल तो मी पाहायचो. ‘सुलतान’ हा शेवटचा सिनेमा पाहिल्याचेही गंबीरने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:17 pm

Web Title: gautam gambhir prefers watching hockey on the television over football and cricket
Next Stories
1 मुंबईच्या गोलंदाजांचा बडोद्यावर अंकुश
2 केनियामध्ये खेळात कारकीर्द घडवणे कठीण
3 बांगलादेशलाही कोरियाचा धक्का
Just Now!
X