सलामी फलंदाज शुबमन गिल यानं ऑस्ट्रेलियात आपलं दुसरं अर्धशतक केलं आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात फक्त ९ धावांनी शुबमनचं शतक हुकलं. १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायन यानं शुबमनच्या खेळीला ब्रेक लावला. शुबमन यानं चेतेश्वर पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागिदारी केली. मेलबर्न कसोटी सामन्यात शुबमन गिल यानं कसोटीमध्ये पदार्पण केलं. शुबमन गिल सध्याच्या मालिकेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेपेक्षा जास्त धावा शुबमन गिलच्या नावावर आहेत. या मालिकेत रहाणेनं ८ डावांत २४४ धावा केल्या आहेत. तर शुबमन गिल यानं सहा डावांत २५९ धावा चोपल्या आहेत.

आणखी वाचा- शुबमन गिलचा धमाका! मोडला सुनील गावसकरांचा ५० वर्ष जुना विक्रम

पाचव्या दिवासाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर रोहित शर्मानं लगेच आपली विकेट फेकली. त्यानंतर शुबमन यानं सामन्याची सर्व सुत्र आपल्याकडे घेत धावसंख्या वाढवली. शुबमन गिल दमदार अर्धशतकी खेळी केली. पुजारानं गिल याला संयमी साथ दिली. पुजारा-गिल या जोडीनं भारतीय संघाच्या विजायाच्या आशा पल्लवीत केल्या. १८ धावसंख्येवर रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी ११४ धावा जोडल्या. गिलनं जगातील अव्वल गोलंदाजांना खणखणीत षटकार मारत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्णाण केला. गिलनं १४६ चेंडूचा सामना करताना ९१ धावांची खेळी केली. एकीकडे पुजारानं संयमानं फलंदाजी करत आपलं काम चोख बजावलं. दुसरीकडे गिलनं फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली.

आणखी वाचा- IND vs AUS : ऋषभ पंतनं मोडला धोनीचा विक्रम

अवघ्या ९ धावांनी शतक हुकलं असलं तरी शुबमन गिल यानं आपल्या खेळीन सर्वांना प्रभावीत केलं आहे. खराब चेंडूवर आकर्षक फटकेबाजी करत अनेकांची मनं जिंकली आहेत. अनेक दिग्गजांनी गिलच्या या खेळीवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. पाहा कोण काय म्हणालं….

नवख्या शुबमन गिल याला बाद करण्यासाठी ऑस्ट्रलियाच्या वेगवान गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा वापर केला. मात्र, गिल यानं पूल शॉट मारत आपल्या स्टाइलमध्ये प्रत्त्युत्तर दिलं.