News Flash

महिला विश्वचषकातील पाकिस्तानी संघाच्या सामन्यांस गुजरात क्रिकेट असोसिएशनचा नकार

मुंबईत होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील पाकिस्तानी संघाच्या सहभागामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. या पाश्र्वभूमीवर या सामन्यांचे यजमानपद अहमदाबादला देण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय)

| January 16, 2013 05:47 am

मुंबईत होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील पाकिस्तानी संघाच्या सहभागामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. या पाश्र्वभूमीवर या सामन्यांचे यजमानपद अहमदाबादला देण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विचाराधीन होते. परंतु गुजरात क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) या सामन्यांच्या यजमानपदास नकार दिला आहे.
पाकिस्तानी संघाच्या सहभागामुळे मुंबईत होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला सावध केले आहे. त्यानंतर बीसीसीआयने याबाबतचा अंतिम निर्णय आयसीसी घेईल, असे स्पष्ट केले होते.
‘‘आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील पाकिस्तानचे सामने अहमदाबादला आयोजित करण्यासंदर्भात बीसीसीआयने आम्हाला विचारणा केली होती. परंतु भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावग्रस्त परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर आम्ही या सामन्यांच्या यजमानपदास नकार कळविला आहे,’’ असे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजेश पटेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2013 5:47 am

Web Title: gujarat cricket association refuses to host womens cricket world cup
Next Stories
1 कोचीत भारताची मसालेदार मेजवानी!
2 मुंबई-सेनादल उपांत्य लढत आजपासून
3 महिला विश्वचषक स्पध्रेतील पाकिस्तानच्या सामन्यांचे ठिकाण आयसीसी ठरवणार : बीसीसीआय
Just Now!
X