News Flash

VIDEO: महिला क्रिकेटपटूने टिपलेला हा अप्रतिम झेल पाहिलात का?

बिरकेटने टिपलेल्या झेलने सर्वच चकीत झाले.

ब्रिस्बेन हीट्स संघाची अष्टपैलू खेळाडू हेडी बिरकेटने सिडनी थंडर्सविरुद्धच्या सामन्यात हवेत झेप घेऊन एक अप्रतिम झेल टिपला.

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ‘बिग बॅश लीग’ने लोकप्रियतेचे शिखर गाठले असून या लीगमध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारे क्षण पाहायला मिळत आहेत. ट्वेन्टी-२० च्या या झटपट क्रिकेटच्या युगात महिला देखील पुरूषांपेक्षा काही कमी नाहीत. बिग बॅश लीगमध्ये एका महिला क्रिकेटपटूने टिपलेल्या अफलातून झेलची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

वाचा: डेव्हिड वॉर्नरकडून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत

ब्रिस्बेन हीट्स संघाची अष्टपैलू खेळाडू हेडी बिरकेटने सिडनी थंडर्सविरुद्धच्या सामन्यात हवेत झेप घेऊन एक अप्रतिम झेल टिपला. बिरकेटने टिपलेल्या झेलने सर्वच चकीत झाले. डीप बॅकवर्ड स्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करतेवेळी बिरकेट चेंडूच्या दिशेने धावत जाऊन हवेत झेपावली. झेल टिपताना तिचा चेहरा थेट जमिनीवर आदळला तरीही बिरकेटने यशस्वीरित्या झेल पूर्ण करत सिडनी थंडर्सच्या नाओमीला बाद केले. ब्रिस्बेन हीट्सने हा सामना गमावला असला तरी बिरकेटने टिपलेल्या झेलने लक्षवेधून घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 7:04 pm

Web Title: haidee birkett magic catch in big bash league
Next Stories
1 डेव्हिड वॉर्नरकडून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत, कसोटीच्या पहिल्याच सत्रात ७८ चेंडूत शतक
2 बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी गांगुली योग्य- सुनील गावस्कर
3 तरुणींची छेड काढणाऱया टवाळखोरांना ऑलिम्पियन पुनियाने घडवली अद्दल
Just Now!
X