11 December 2018

News Flash

हार्दिक पांड्याच्या नव्या लुकची चर्चा

बदल एक नवी सुरुवात

हार्दिक पांड्या ( सोशल मीडिया)

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पांड्याने खुद्द विश्रांतीची गरज असल्याचे सांगत दक्षिण आफ्रिकेविरुद्दच्या मालिकेसाठी मैदानात उतरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. संघातून बाहेर असला तरी पांड्या नेहमीच चर्चेत असतो. एका मासिकातील मुखपृष्ठावर झळकलेल्या फोटोमुळे तो चर्चेत आहे. ‘मॅक्सिम इंडिया’ मासिकाच्या अधिकृत ट्विटवरुन यंदाच्या मुखपृष्ठावर हार्दिक पांड्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिवाय पांड्याने देखील काही फोटो पोस्ट करत अनोखा अंदाज ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आयुष्यात आपल्या आवडीनुसार वागा. तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे स्टाईल करु शकता. स्वत:च्या स्टाईलमध्ये बदल करण्यासाठी कोणालाही घाबरण्याची गरज नाही. बदल ही नवीन सुरुवात असेल, अशा आशयाचा संदेश त्याने फोटो शेअर करताना दिला आहे.

मात्र, हार्दिकच्या ऑफफिल्ड लुकवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही नेटकरी त्याची थट्टा उडवत आहेत. तर काही जण त्याला खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. एकूणच फोटोवर उमटणाऱ्या प्रतिक्रियावरुन पांड्याचा नवा अवतार चाहत्यांना रुचलेला नाही, असेच चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा धमाकेदार फलंदाज हार्दिक पांड्या मैदानातील खेळीशिवाय स्टाईल स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय असून, काही दिवसांपूर्वी फोटोशिवाय अभिनेत्री प्ररिणीती चोप्रासोबत ट्विटरवर रंगलेल्या जुगलबंदीमुळे चर्चेत आला होता.

First Published on November 14, 2017 12:18 pm

Web Title: hardik pandya is out of team india for the first two test against sri lanka after team selection he tweeted