News Flash

कसोटीत अष्टपैलू होण्यासाठी हार्दिक पांड्याला अवकाश – मायकल होल्डिंग

हार्दिकचा खेळ अष्टपैलू खेळाडूप्रमाणे नाही!

कसोटीत अष्टपैलू होण्यासाठी हार्दिक पांड्याला अवकाश – मायकल होल्डिंग
हार्दिक पांड्या (संग्रहीत छायाचित्र)

आयपीएलमधल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याला भारतीय संघाची दारं उघडी झाली. वन-डे संघात आपली छाप पाडल्यानंतर हार्दिकला कसोटीत संघातही स्थान मिळालं. या अष्टपैलू कामगिरीमुळे हार्दिकची तुलना माजी कर्णधार कपिल देव यांच्याशीही व्हायला लागली होती. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये हार्दिकला म्हणावी तशी चांगली कामगिरी अद्याप करुन दाखवता आलेली नाहीये. इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येही हार्दिकने पुरती निराशा केली आहे. वेस्ट इंडिजचे महान माजी क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांच्यामते हार्दिकला कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणता येणार नाही.

अवश्य वाचा – Ind vs Eng : ‘हार्दिक पांड्या ऑल राउंडर नाही’, हरभजन सिंगचे टीकास्त्र

“भारताच्या आक्रमणात मला म्हणावी तशी धार दिसली नाही. गोलंदाजीत मदत होण्यासाठी भारत हार्दिक पांड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळवत आले, मात्र दुर्दैवाने हार्दिक अष्टपैलू खेळाडू्ला साजेशी गोलंदाजी करतच नाहीये. हार्दिक जर चांगला फलंदाज आहे, आणि त्याला फलंदाजीत ज्या क्रमांकावर संधी मिळतेय तिकडे त्याने चांगल्या धावा काढायला हव्यात. प्रत्येक वेळी खेळाडूने शतक ठोकायलाच हवं अशातला भाग नाही, कित्येकदा तुमची ५०-६० धावांची खेळी संघाच्या विजयात महत्वाचा हातभार लावून देते. गोलंदाजीत हार्दिकने विकेट घेणं अपेक्षित आहे. असं झालं असतं तर चांगलचं होतं, मात्र दुर्दैवाने असं घडताना दिसत नाहीये.” होल्डिंग यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं.

“हार्दिकच्या गोलंदाजीत वैविध्य आहे असं मला वाटत नाही. तो एका षटकात २-३ चेंडू चांगले टाकतो, मात्र त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. फलंदाजाला दबावात टाकेल अशी गोलंदाजी हार्दिक करत नाही. जर तुमचा कर्णधार तुमच्यावर एक जबाबदारी सोपवत असेल, आणि तुम्ही स्वतःला अष्टपैलू म्हणवून घेत असाल तर तुम्ही त्या दर्जाची कामगिरी करणं गरजेचं आहे. मात्र, मला हार्दिक आताच्या घडीला कोणत्याही प्रकारे अष्टपैलू खेळाडू वाटत नाही.” तिसऱ्या कसोटीसाठी होल्डिंग यांनी हार्दिक पांड्याएवजी संघात अतिरीक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवा अशी सुचनाही भारतीय संघाला दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2018 11:31 am

Web Title: hardik pandya not a test all rounder yet says michael holding
टॅग : Hardik Pandya
Next Stories
1 मी कसोटीत सलामीला येण्यासाठी तयार, ‘हिटमॅन’ रोहितचं सूचक वक्तव्य
2 विजयाचा वाटाडय़ा!
3 प्रेरणादायी कर्णधार!
Just Now!
X